ब्लॉगबद्दल


कोणत्याही एका विषयावर भरघोस लिहावं एवढा माझा अभ्यास नाही आणि अनुभवही. तरीही आत्मसंतुष्टीसाठी हा लेखनप्रपंच. नकळत त्यातून कोणाला रसग्रहण करता आले तर तेही नसे थोडके!

20 Comments

  1. आज प्रथमच एक अव्यक्त प्रेमाची कथा वाचायला मिळाली. “आत्मसंतुष्टीसाठी हा लेखनप्रपंच ” संतुष्ट करणारा व आश्वासक आहे ! पुढील अश्या कथांची उत्सुकता आहे.

    1. एवढ्या सातत्याने लिहिता येत नाही हो! एकदा लिहिलेली दीर्घकथा लागोपाठ ५ दिवस पोस्ट केली एवढंच. नाहीतर एकाडेक दिवस काहीतरी टाकण्याचा प्रयत्न असतो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

  2. ब्लॉगची पाने वापरायची आपली काप्लाना एकदम पसंत… जुने सगळे आर्टिकल्स नीट अक्सेस करता येतात.. भारी.. जरा वेळ मिळाला की बसून तसे केले पाहिजे खरे आता… वाचकांची एकदम सोय होते…

  3. नमस्कार संपदाताई..

    “आत्मसंतुष्टीसाठी हा लेखनप्रपंच” हा प्रामाणिकपणा खुप भावला. ब्लॊग वाचतोय, पुर्ण वाचुन झाले की लिहीनच..

    पु.ले.शु.

    सस्नेह,

    विशाल

  4. नमस्कार,

    तुमचा ब्लॉग पाहीला आवडला.
    तुमचे निवडक लेख मीमराठी.नेटच्या वाचकांसाठी देखील उपलब्ध करुन द्यावेत असे इच्छा आहे.
    जर तुम्हाला हरकत नसेल तर, निमंत्रित लेखक म्हणून मी तुम्हाला मीमराठी.नेट तर्फे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
    मी मराठी.नेट ह्या संकेतस्थळाबद्दल मी येथेच काही लिहीत नाही तुम्ही खालील दुव्यावर टिचकी मारुन स्वतः एकदा संकेतस्थळ पाहून घ्यावे ही विनंती.

    आपलाच,

    व्यवस्थापक
    मीमराठी.नेट
    http://www.mimarathi.net

  5. आदरणीय संपदाताई,
    आपली गुप्तधन ही कथा वाचली, खूप सुंदर व बोधक आहे.
    आमच्या श्वास साप्ताहिकाच्या यंदाच्या दिवाळी अंकात पैसा हा विषय केंद्रस्थानी ठेवून लोकांना प्रबोधन व मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
    या अंकात आपली गुप्तधन ही कथा छापण्याची आमची ईच्छा आहे. तर ती छापली तर चालेल का, यासाठी shwassaptahik@gmail.com यांवर आपली प्रतिक्रिया पाठवल्यास आम्ही ती छापू शकू. कळावे, धन्यवाद!

  6. आदरणीय संपदाताई,
    आपली कथा वाचली, खूप छान व बोधक आहे.
    यंदाच्या दिवाळी अंकातून पैसा या विषयावर मार्गदर्शन व प्रबोधन करण्याचा विचार आहे. तरी आपण आम्हाला आपली गुप्तधन ही कथा आमच्या दिवाळी अंकात छापण्यास परवानगी दिली तर आम्हाला खूप आनंद होईल. कळावे, धन्यवाद!

    विजय वरखडे (पत्रकार), बंडू दातीर (पत्रकार)

Leave a reply to विशाल कुलकर्णी उत्तर रद्द करा.