सुडोकू  -संपदा म्हाळगी-आडकर
 

अमेरिकेत आल्यानंतर, माझा सुडोकू ह्या खेळाशी परिचय झाला. तसा टाइमपाससाठी शब्दकोडे किंवा इतर कोडी सोडवायला मला खूप आवडतं. सुडोकूने मला आणि माझ्या नवऱ्याला चांगलं झपाटलं आहे.

सुडोकू हा जपानी अंकखेळ आहे. सुडोकूमध्ये साधारणत: ८१ छोट्या चौरसांनी बनलेला, ९*९ चा एक मोठा चौरस असतो.  ८१ पैकी, बहुतांश चौरस मोकळे असतात. सुडोकू तयार करणाऱ्याने, १ ते ९ पैकी काही आकडे ह्या ८१ पैकी. काही चौरसांमध्ये विखरून ठेवलेले असतात. विखरून ठेवलेल्या आकड्यांची मांडणी अशी काही केलेली असते की

१. मोठ्या चौरसाच्या एका ओळीत आणि एका खांबात १ ते ९ पैकी सारे आकडे यायला हवेत आणि कोणत्याही आकड्याची पुनरावृत्ती नको.

२. मोठ्या चौरसाच्या आत असलेल्या ३*३ च्या ९ चौरसांमध्येही १ ते ९ पैकी सारे आकडे यायला हवेत आणि कोणत्याही आकड्याची पुनरावृत्ती नको.

गाळलेल्या चौरासातले आकडे अचूक भरणं म्हणजेच हे अंककोडं सोडवणं. एका सुडोकूला बहुतांशी एकच उत्तर असते. पण एकापेक्षा जास्त उत्तरे असेली सुडोकू कोडीही असतात.

हा खेळ खूप addictive आहे. तो खेळताना डोक्यालाही चांगली चालना मिळते. वारंवार खेळल्याने त्याचा चांगला सराव होतो आणि खेळण्याची तंत्रे साहजिकच अंगी बाणली जातात. कोणाची इच्छा असल्यास, सुडोकू कोडे सोडवायची काही तंत्रे अथवा उदाहरणे मी उपलब्ध करून देईन.

सुडोकूच्या काठीण्यावर सुडोकू सोडवण्याचे तंत्र अवलंबून असते. महासुडोकू सारखे ९*९ चे ८ किंवा जास्त चौरस एकात एक गुंफलेले, मोठे सुडोकू कोडे असते ते सगळ्यात कठीण असते.

सुडोकू हा खेळ पुस्तक, हस्तखेळ रुपात, वर्तमानपत्रात, इंटरनेटवर तसेच फोनवरही उपलब्ध आहे. सुडोकुची असंख्य पुस्तके बाजारात विकत मिळतात. एकटे असताना खेळण्यासाठी मेंदूला चांगले खाद्य आहे.

शास्त्रीय अभ्यासावरून हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीराप्रमाणे आपल्या मेंदूचेही वय वाढते. वयोमानाप्रमाणे होणारे स्मृतीभ्रन्शाचे आजार जसे डिमेन्शिया, अल्सायमर्ज ह्यामध्ये अथवा ते टाळण्यासाठी, डोक्याला चालना देणारे नवनवीन प्रश्न अथवा कोडी सोडवल्याने माणसाची स्मृती जास्त कार्यरत राहते. ह्या अभ्यासात शब्दकोडी व बुद्धिबळापेक्षाही सुडोकूने जास्त मदत झाल्याचे सिद्ध झाले आहे.
 
Advertisements