टाइम मासिकाच्या “जगातील सर्वात प्रभावी (most influential) १००” व्यक्तींच्या यादीतील भारतीय -संपदा म्हाळगी-आडकर ५/८/१० 
 
ह्या वेळेच्या टाइम मासिकाच्या मे अंकात जगातील सर्वात प्रभावी (most influential) १०० व्यक्तींची यादी दिली आहे. ह्या यादीत अपेक्षेनुसार काही भारतीय/ भारतीय वंशाचे लोकही आहेत. ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. ह्या प्रभावी लोकांचा आणि त्यांच्या कामाचा परिचयही अश्याच काही प्रभावी लोकांनी करून दिला आहे. म्हणूनच येणाऱ्या काही पोस्ट्स मध्ये, टाइम मासिकातील हे उतारे येथे इंग्रजीमध्ये उधृत करून त्याचा अनुवादही देत आहे. मी प्रथमच अनुवाद करत असल्याने चुका असतील तर त्या कळवाव्या.
 
१. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग 
Manmohan Singh,Prime Minister of India-Visionary Leadership
Manmohan Singh
The quiet engine of India’s progress
By Indra Nooyi
 
The long history of India boasts many great leaders. But the much shorter history of Indian democracy is already creating its own heroes, and Manmohan Singh, 77, is one of them.
 
As India’s Fianance Minister from 1991 to 1996, Singh realized that India had everything to gain by opening up to the world. Through his tireless efforts to cut bureaucracy and open markets, he released India’s potential for the benefit of it’s people.
 
Now as Prime Minister, he is guiding India into the ranks of great powers. India today is a critical engine of global growth, a vital partner in global security and a model for democratic development. Perhaps more important, Singh is ensuring this progress is not enjoyed by a chosen few; he realizes that economic development is the best antipoverty program a government can design.
 
Albert Einstein said, “Try not to become a man of success but rather try to become a man of value.” In endeavouring to lift India’s people to prosperity and stability, Singh has achieved both.
 
Nooyi is chairwoman and CEO of PepsiCo.

मनमोहन सिंग
भारताच्या प्रगतीचे अध्वर्यू 
-इंद्रा नुयी
 
भारताच्या मोठ्या इतिहासात काही उत्तमोत्तम नेते होऊन गेले. मात्र भारताच्या स्वातंत्र्योत्तर लोकशाहीचा छोटा कालावधी स्वत:चे नायक (हिरो) निर्माण करत आहे व सत्त्याहत्तर वर्षीय मनमोहन सिंग हे त्यांपैकीच एक आहेत.
 
१९९१ ते १९९६ ह्या कालखंडात भारताचे अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना, ‘कक्षा रुंदावल्याने भारताचा सगळ्यात मोठा फायदा’ असल्याचे त्यांना जाणवले. स्वत:च्या अथक परिश्रमाने लालफितीचा कारभार थांबवून आणि व्यापार खुला करून, जणूकाही भारतीय जनतेच्या हितासाठी त्यांनी भारताची क्षमता जगासाठी खुली केली.
 
आता भारताचे पंतप्रधान म्हणून, भारत हा जागतिक महासत्ता होण्यासाठी ते अमूल्य मार्गदर्शन करीत आहेत. आज भारत हा जागतिक वृद्धीचा स्रोत, जागतिक सुरक्षेतला भागीदार व लोकशाही विकासाचे उत्तम उदाहरण आहे, पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी भारताची ही प्रगती काही लोकांपुरती राहू मर्यादित दिलेली नाही. “कोणत्याही सरकारने केलेली आर्थिक उन्नती हीच दारिद्र्य उच्चाटनासाठी आखलेला सर्वोत्तम कार्यक्रम असू शकते” ह्याची त्यांना जाणीव आहे.
 
महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनच्या मते, ‘सफल माणूस होण्यापेक्षा, मूल्यवान/तत्वनिष्ठ माणूस होण्याचा प्रयत्न करा.” भारताच्या जनतेला स्थैर्य आणि भरभराटीकडे नेण्याच्या प्रयत्नात, सिंग ह्यांनी दोन्ही (मूल्य व सफलता)  मिळवले आहे.
 
इंद्रा नुयी ह्या पेप्सीको कंपनीच्या अध्यक्ष व वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आहेत. (पुरुषप्रधान जगात व व्यवसायात, त्या अतिशय यशस्वी अश्या काही स्त्रियांमध्ये गणल्या जातात. ह्यामुळेच अनेकांना प्रेरणादायी आहेत.)
 
***
Advertisements