नमस्कार मंडळी,
ब्लॉग सुरु करून दोन महिने झाले. हे दिवस किती लवकर सरले, कळलंही नाही. आपल्या भावना प्रतिक्रिया, सूचना, समीक्षण, विश्लेषण आणि विवेचन ह्या सगळ्या रुपात माझ्यापर्यंत पोहोचत आल्या आहेत. त्यांसाठी मी आपली सर्वार्थी आभारी आहे.

परदेशात वास्तव्यास असणाऱ्या मला, सध्या मायभूमीचे वेध लागले आहेत. याच कारणास्तव पुढचे काही दिवस मी आपली रजा घेत आहे. काही काळासाठी पडणारा हा खंड नंतर भरून निघेल, असा माझा प्रयत्न असेल. परत आल्यावर आपली अशीच साथसंगत मिळेल ही अपेक्षा!

साभार
-संपदा म्हाळगी-आडकर

Advertisements