दु:ख राधेच्या भर्ताराचे


दु:ख राधेच्या भर्ताराचे -संपदा म्हाळगी-आडकर १/२२/१०
 
थोडक्यात पार्श्वभूमी: राधा कृष्ण प्रेमाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत. राधा कृष्णाची सर्वात मोठी भक्त होती. ती विवाहित होती. तिच्या भर्ताराविषयी फारसे लिहिले गेलेले नाही. त्याची व्यथा समजून घेण्याचा हा एक प्रयत्न!
 
असे सुंदर आर्या ती राधा माझी भार्या
माझा संसार त्यागून भाळली यादववर्या
 
वृंदावनी नित्य चाले, राधेसंगे त्याची रास
माझ्या भरल्या घरात, माझा चाले वनवास
 
माझा संसारी सन्यास, हा कसला विसंग
तिला नको माझा संग, पण हवासा सत्संग
 
तो जगाचा कर्तार, तो विष्णूचा अवतार
व्यर्थ जगत फिरतो मी राधिका भर्तार 
 
तो सगुण निर्गुण, तो ज्ञान मी अज्ञान
पूर्वजन्मीच्या पापांचे का मी करितो क्षालन?
 
हा पत्नीत्यक्त जीव, माझी चालतसे निंदा
का ह्यात लपविला माझा मोक्ष रे गोविंदा?
 

8 Comments

    1. धन्यवाद हेरंब!
      राधेने धर्म आणि समाजाचे पाश तोडून कृष्णाला वाहून घेतल्याचे पुराणसिद्ध आहे. तिला कृष्णामुळे देवत्व प्राप्त झाल्याने, तिच्या विवाहबाह्य संबंधांवर फारशी चर्चा होत नाही. काहीही झाले तरी कृष्णाशी तिचे विवाहबाह्य संबंधच होते.

  1. tumchi kavita chaan ahe, mhnje tyachi vyatha tumhi shabdat yogya prakare mandli ahe. pan tumhi var comment madhye lihilat ‘काहीही झाले तरी कृष्णाशी तिचे विवाहबाह्य संबंधच होते.’ he mala patale nahi. mazya mahiti pramane Krishna ha Radhe pekha vayane phaar lahan hota.

    1. विवाहबाह्य असे म्हणले कारण, संबंध हे फक्त शारीरिक नसतात. कृष्णाचे आणि राधेचे नाते जास्त मानसिकच होते. राधा विवाहित असल्याने, विवाहाबाहेर ठेवलेले कुठलेही संबंध मग ते शारीरिक किंवा मानसिक दोन्ही “विवाहबाह्य” च झाले. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      1. ह्या कवितेतील ’ गृहीत’ कुठल्याच कृष्ण चरित्रात आढळत नाही(तुमच्या कडे काही संदर्भ असेल तर जरूर द्या ) आणि म्हणूनच हा ’पैलू’ आजतागायत अस्पर्श राहीला !

        दुसरे म्हणजे विवाहा मुळे होणारे संबंध विवाह झालेला नसतांना ठेवलेत तरच त्याला ’विवाहबाह्य ’ संबंध म्हणणे उचित ठरेलसे वाटते. इतर कुठल्याही संबंधां साठी तॊ शब्द बरॊबर वाटत नाही. येथे तुमच्या प्रत्युत्तरातील तो शब्द मलाही खटकला व तुमच्या खुलाशानेही समाधान होत नाही.

        बाकी मग एखाद्या तिऱ्हाईताच्या व्यथे संबंधी असे जर समजले तर कवितेची भट्टी जमली आहे !

Leave a reply to शब्दांकित उत्तर रद्द करा.