गाडीची तोतो
गाडीची तोतो -संपदा म्हाळगी-आडकर ५/१५/१० मागच्या आठवड्यात पाऊस झाल्याने, आज गाडी धुवायला गॅस स्टेशन (पेट्रोल पंप) वर घेऊन गेलो होतो. गाडी आतून खराब झाल्याने आधी वॅक्युम केली, मग गाडी धुण्यासाठी ऑटोमॅटिक कार-वॉश मध्ये नेली. आधी वॅक्युमच्या आवाजाने घाबरलेली माझी दीड वर्षाची मुलगी, त्या ऑटोमॅटिक कार-वॉशमध्ये पार भांबावून गेली. कार-वॉशच्या बोळात शिरल्यावर, अंधार झाल्याने मगाचचा (रडण्याचा) [...]

