Posts from the ‘बाटलीतली श्रीमंती’ Category

बाटलीतली श्रीमंती (भाग ४)

एअरपोर्टवर वेळेत पोहोचायचं होतं. वाटेत १ काम करून जायचं होतं. रॉबिनला सुझीचा राग आला. “तुला आयत्या वेळेस कसं सुचतं ग सगळं? आधी का प्लान केलं नाहीस?” त्याचे प्रश्न सुरु झाले. “थांब रे २ मिनिटांचं काम आहे.”. Mall मध्ये जाऊन आपलं २ मिनिटांचं काम १० मिनिटांत पूर्ण करून सुझी परत आली. ती आज खूपच उत्साहात होती. [...]

बाटलीतली श्रीमंती (भाग ३)

कागद वाचताना अश्रू कधी झरू लागले, सुझीला कळलंच नाही. पत्र संपल्यावर इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. ती ढसाढसा रडू लागली. रॉबिनचे डोळेही पाणावले होते. त्याने हळूच सुझीला कुशीत घेतलं.   ****    बाटलीचं काय करावं ह्या विचारात रॉबिन कित्येक दिवस गढलेला होता. हा विषय सुझीपाशी काढला की तिला रडू यायचं आणि दिवसाचं खोबरं [...]

बाटलीतली श्रीमंती (भाग २)

सुझी कॉलेजच्या शिक्षणानिमित्त युरोपात राहिली होती. भाषांची आवड असल्याने तिने Spanish आणि जर्मन शिकून घेतली. तिने वाचायला सुरुवात केली.   तारीख- ४ ऑगस्ट १९३८   ठिकाण- प्राग प्रिय स्टीव्ही, तू कसा आहेस? तुला भेटून खूप दिवस झाले. तुला झेक समजत नाही म्हणून मी जर्मन मध्ये लिहायचा प्रयत्न करत आहे. ३ महिन्यापूर्वी भेटलास तेंव्हा तू हे गुलाबी [...]

बाटलीतली श्रीमंती (भाग १)

बाटलीतली श्रीमंती  -संपदा म्हाळगी-आडकर २/५/१०   चार्लस्टन, वर्जिनियाच्या समुद्र किनाऱ्यावर आज रॉबिन एकटाच फिरत होता. सुझी आज त्याच्याबरोबर वॉकला आली नव्हती. २ दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे, तिला कणकण आली होती. वादळानंतर समुद्र शांत दिसत होता. आपल्या गर्भितातलं त्याने बरंच काही किनाऱ्यावर रितं केलं होतं. कचरा आणि समुद्री पाचोळ्यातून अधून मधून रंगीबेरंगी शंख-शिंपले चमकत होते.   मार्क [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.