तळव्यावर मेंदीचा (भाग ५)
जेवताना आईने विषय काढला, “उप्पू, फोटो पाहिलास का रे?” “हो” -उत्पल. “आवडली का मुलगी? चांगली शिकलेली आहे” -आई. “हो चांगली आहे” -उत्पल. “मग त्यांना फोन करून भेटायला बोलावू का?” -आई. “एक दिवस थांब, मी विचार करून सांगतो” -उत्पल. आईचा थोडा हिरमोड झाला. मनुच्या घरीसुद्धा जेवणं आटोपली. मनु आईला मागची आवारावर करायला मदत करत [...]

