Posts from the ‘दीर्घकथा’ Category

अंतर्धान (भाग ३)

अंतर्धान (भाग ३) -संपदा म्हाळगी-आडकर ५/३१/१०   भाग १ भाग २ भाग ३ कोपऱ्यातील खुर्चीत अभ्यासाचं पुस्तक वाचत बसलेला रोहित, उठून सुहासपाशी आला. “मामा, तुला काही खायचंय का?” “नाही, नको,…..  तुला भूक लागलीय का?” “हो, थोडी!” “बर मग तू खाऊन येतोस का?” “तू पण ये ना, मला एकट्याला खायची सवय नाही रे! म्हणजे एकट्याने खाल्लं [...]

अंतर्धान (भाग २)

अंतर्धान (भाग २) -संपदा म्हाळगी-आडकर ५/२८/१०   भाग १ भाग २ भाग ३ “सुहा, ए सुहा”, आई लंगडत लंगडत परसात आली. सुहा परसात लगोरी खेळत होता. आई नक्की काहीतरी काम सांगणार असं गृहीत धरून जीवावर आल्यासारखं सुहा म्हणाला, “कायsss ग?” “एक काम करशील माझं?” “आता नाही, मी खेळतोय.”, सुहा निरुत्साही पणे म्हणाला. “अरे वैद्यांकडे जाऊन औषध [...]

अंतर्धान

अंतर्धान -संपदा म्हाळगी-आडकर ५/२३/१०   भाग १ भाग २ भाग ३   अतिदक्षतागृहाच्या काचेच्या तावदानातून आत बघत सुहास अतिशय निर्विकार चेहऱ्याने उभा होता. आईच्या कोमेजलेल्या, निपचित देहाकडे पाहत होता. त्याची सत्तरएक वर्षांची, इतकी वर्षे जगण्याच्या लढाईत जिंकणारी आई, मृत्यूशी झुंज देत होती. सुहासला आठवलं, मागच्या भेटीत आई म्हणाली होती, ‘सुहा, अंथरुणावर लोळागोळा होऊन पडून राहण्यापेक्षा [...]

तळव्यावर मेंदीचा (भाग ५)

  जेवताना आईने विषय काढला, “उप्पू, फोटो पाहिलास का रे?” “हो” -उत्पल. “आवडली का मुलगी? चांगली शिकलेली आहे” -आई. “हो चांगली आहे” -उत्पल. “मग त्यांना फोन करून भेटायला बोलावू का?” -आई. “एक दिवस थांब, मी विचार करून सांगतो” -उत्पल. आईचा थोडा हिरमोड झाला.    मनुच्या घरीसुद्धा जेवणं आटोपली. मनु आईला मागची आवारावर करायला मदत करत [...]

तळव्यावर मेंदीचा (भाग ४)

“मनु, भेटली का शुभदा?” -आई. “हो! खूप मजा आली” -मनु. “कशी आहे ती? पुढच्या वेळेला तिला घरी बोलव. मी सांगितलंय म्हणून सांग” -आई. “हो” -मनु. ***   लॉग्ड इन ऍज ‘Caveman’. नव्या इमेलचा प्रबंध चालू आहे. Dear SaberCat, I missed you for last two days. I like you. I think, I am falling in love [...]

तळव्यावर मेंदीचा (भाग ३)

“ओनीर इंटरव्यू कसे चालू आहेत?” -उत्पलने फोनवरून प्रश्न विचारला. आज ऑफिसमध्ये तो उशिरा आला होता. “सो फार सो गुड. चांगले चालू आहेत. काही अगदीच बिगिनर्स आहेत. बहुतेक सगळे गेमिंग सोफ्टवेअरचा अजिबात अनुभव नसलेले” -ओनीर. “ओह बर. लेट्स सी हाऊ इट गोज. मुख्य म्हणजे गेमिंगचा कल पाहिजे. aptitude!” -उत्पल.  फोन झाल्यावर उत्पल इंटरव्यूविषयी विचार करत होता. [...]

तळव्यावर मेंदीचा (भाग २)

  “आई, आज गजर झाला नाही का ग?” खोलीतून बाहेर येत, उत्पल डोळे चोळत आईला म्हणाला. “अरे झाला की. खूप वेळ वाजत होता. शेवटी मीच येऊन बंद केला. तुला हाक मारली, हलवलं पण” -आई. “पण उठवायचं ना!” -उत्पल. “हाक मारली, हलवलं? आता अजून काय करायचं? तू अजिबात उठत नव्हतास. काल रात्री गेम खेळत बसला असशील. [...]

तळव्यावर मेंदीचा (भाग १)

तळव्यावर मेंदीचा -संपदा म्हाळगी-आडकर २/२७/१०   रात्रीचे २ वाजलेत. इंटरनेटवर तो इमेल चेक करतोय. डोळे फक्त एका इमेलच्या प्रतीक्षेत. “ती रोज न चुकता येते खेळायला. आज कशी नाही आली?”, “एक इमेल तरी करायची ना?”, “मला का करेल ती इमेल? मी कोण तिचा? ती तरी कोण माझी?” असे अनेक विचार त्याच्या मनात चाललेत. तेवढ्यात स्वयंपाकघरात काहीतरी वाजलं [...]

बाटलीतली श्रीमंती (भाग ४)

एअरपोर्टवर वेळेत पोहोचायचं होतं. वाटेत १ काम करून जायचं होतं. रॉबिनला सुझीचा राग आला. “तुला आयत्या वेळेस कसं सुचतं ग सगळं? आधी का प्लान केलं नाहीस?” त्याचे प्रश्न सुरु झाले. “थांब रे २ मिनिटांचं काम आहे.”. Mall मध्ये जाऊन आपलं २ मिनिटांचं काम १० मिनिटांत पूर्ण करून सुझी परत आली. ती आज खूपच उत्साहात होती. [...]

बाटलीतली श्रीमंती (भाग ३)

कागद वाचताना अश्रू कधी झरू लागले, सुझीला कळलंच नाही. पत्र संपल्यावर इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. ती ढसाढसा रडू लागली. रॉबिनचे डोळेही पाणावले होते. त्याने हळूच सुझीला कुशीत घेतलं.   ****    बाटलीचं काय करावं ह्या विचारात रॉबिन कित्येक दिवस गढलेला होता. हा विषय सुझीपाशी काढला की तिला रडू यायचं आणि दिवसाचं खोबरं [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.