घनव्याकूळ -संपदा म्हाळगी-आडकर ११/१७/१०   आज सकाळी बाहेर धो-धो (नवऱ्याच्या भाषेत रापचिक) पाऊस पडत होता. gas वरचा आल्याचा चहा, पाच मिनिटं पावसात भिजून ये म्हणून सांगत होता. डोक्यात कविता होती ग्रेसची! “ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादात होता…” बाहेरचा धो-धो पाऊस, मनात रिमझिम करत होता. वळणाचं पाणी वळणावर येऊन मार्गस्थ होतं, पण मी रेंगाळत होते एकाच [...]