बिट्टी -संपदा म्हाळगी-आडकर १०/११/१० माझी आजची पोस्ट, पुरुषवर्गाला बायकी भावनांवर तोंडसुख घ्यायला भरपूर वाव देणारी आहे. लहानपणी काही विचार आणि मनोभावना ह्यांची सांगड, आपण आपल्याला पटेल त्या पद्धतीने घालतो. आणि तेच खरे/बरोबर मानून पुढे जात असतो, आपले भाव-विश्व त्याभोवती गुंफत असतो. “Back-of-the-mind” कुठेतरी माहितही असतं कि ‘हे सगळं खोटं आहे’. पण पटत नाही. ते सगळं [...]