Archive for जुलै, 2010

तेंडूलकर.. चरित्र.. रक्त.. संमिश्र भावना

तेंडूलकर.. चरित्र.. रक्त.. संमिश्र भावना -संपदा म्हाळगी-आडकर ७/२१/१०    मी सचिन तेंडूलकर ह्या व्यक्तीची निस्सीम चाहती आहे. व्यक्तिगत, सामाजिक आणि व्यावसाईक आयुष्यात त्याने एक सुंदर बॅलन्स सांभाळला आहे. त्याच्या चरित्राविषयी जेंव्हा आंतरजालावर वाचलं तेंव्हा मन संमिश्र भावनांनी भरून गेलं.   सचिनने चरित्र लिहिणं चांगलं आहे. सचिनचं चरित्र खूप जणांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल. ह्यात कोणतेही दुमत नाही. [...]

बबल

बबल -संपदा म्हाळगी-आडकर ७/१७/१०   काल काही निमित्ताने सिटीमध्ये जाण्याचा योग आला. ट्रेन घेऊन एकटीच सिटीमध्ये जाऊन आले. माझा जॉब सिटीमध्ये नसल्याने, ट्रेनने एकटीने जाण्याची वेळ खूप कमी येते. मुळची पुण्याची असल्याने तसा ट्रेनशी संबंध कमीच! लोकलमध्ये चढण्याची सवय नसलेल्याला जसे नेहमीचे पासेन्जर्स, पाकीटमार जसे पटकन ओळखतात तसे काहीसे लोकांनी मलाही ओळखले असावे.   ट्रेनमध्ये बसल्यावरही [...]

अशाच एका कातरवेळी

अशाच एका कातरवेळी -संपदा म्हाळगी-आडकर ५/३१/१०   आज सोडून काम-धंदा, बसलो निवांत घरी निरव असुनी परसदार पण, आवाज येई कुठून तरी.. अशाच एका कातरवेळी   मी दिशेत जातो आवाजाच्या, तो माझ्या मागे फिरी घरभर फिरलो शोधण्यास, अन रित्या हाती माघारी.. अशाच एका कातरवेळी   शोधून दमलो, थकून बसलो, आवाज येत राहीला परी जुनाच कुठसा बोल आठवून, [...]

दशम ग्रह

दशम ग्रह -संपदा म्हाळगी-आडकर ७/१०/१०   दशम ग्रह! नाही, नाही मी एरिसबद्दल बोलत नाहीये. मी बोलतेय दशम ग्रह अर्थात जावई! परवा माझ्या असं लक्षात आलं की, जावयाच्या जातीला स्थळ, काल, जन्म, भाषा, संस्कृती ह्या कोणत्याही गोष्टीने काही फरक पडत नाही. बर घडलंही तसंच! ऑफिसमधल्या कोणाची तरी सासू घरी राहायला येणार होती आणि थोडे-थोडके नाही २ महिने! [...]

लिपस्टिक

लिपस्टिक -संपदा म्हाळगी-आडकर ५/२९/१०   मुली आणि नटणं-मुरडणं हे समानार्थी शब्द असल्याचं मान्य करण्यास कोणाची हरकत नसावी. माझ्या बाबतीतही ते खरं आहे. लहानपणी म्हणजे अगदी ४-५ वर्षाची असताना मला झगमग कपडे, उंच टाचेच्या चपला, मेक-अप, नटणं-मुरडणं ह्याचं विलक्षण आकर्षण होतं. माझ्या मामीला ह्या गोष्टींचं ज्ञान आणि आवड असल्याने ती माझी रोल-मॉडेल होती.   शनिवार-रविवार आजोळी राहायला [...]

हौसे, नवसे आणि गवसे

हौसे, नवसे आणि गवसे – संपदा म्हाळगी-आडकर ०७/०६/२०१०  माझ्या वडिलांचं लहानपण पुण्याजवळच्या, कडूस नावाच्या एका छोट्या गावात गेलं. ह्या गावामध्ये कोपऱ्या-कोपऱ्यावर वेगवेगळे देव-देवता आहेत. प्रत्येक देवाचा सण, उरूस, जत्रेची तिथीही ठरलेली. त्या त्या वेळी ते ते सगळं अजूनही निर्वेध चालू आहे. माझ्या लहानपणी आजी आणि कधी कधी बाबा जत्रेविषयी, उरुसाविषयी गोष्टी सांगत. बाबा सांगायचे, जत्रेत [...]

दारू आणि विनोद

दारू आणि विनोद -संपदा म्हाळगी-आडकर ०७/०५/२०१० दारू…… मदिरा, ड्रिंक्स, अल्कोहोल कितीही वेगवेगळी नावे दिली तरी दारू ही दारूच! कुणाची काचेच्या ग्लासातली, कुणाची स्टीलच्या पेल्यातली. कुणाची चपटीतली, कुणाची बाटलीतली. कुणाची पेगातली, कुणाची क्वार्टरमधली, कुणाची खम्ब्यातली एवढाच काय तो फरक! अनेक जणांच्या आपुलकीचा, जिव्हाळ्याचा विषय असलेली दारू…. दारूची आणि दारू ह्या विषयाची मी आग्रही नाही कि पुरस्कर्ती [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.