अनुवाद सौजन्य: वेगा
अनुवाद येथे वाचता येईल: http://vegapoint.blogspot.com/2010/03/moonroof.html
“आले आले.. डबे भरतेय.” मानसी ही ठरलेली उत्तर देत होती. लग्नाला दोनच महिने झाले होते. अजूनही उष्ट्या हळदीचा वास तसाच होता.
मिलिंद आणि मानसी आय टी पार्क मध्ये प्रेमात पडलेल्या असंख्य जोडप्यांपैकीच एक. एकमेकांना साजेसे. दोघेही सुशिक्षित, सुसंस्कारित. लव्ह मरेज. थोडसं घाई-गडबडीत झालेलं. नाही पळून-बिळून नाही केलं. मिलिंदच्या बाबांना पाच महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न गडबडीत उरकावं लागलं.
“मानसी आवर ना! गाडी जाईल.” -मिलिंद परत.
मिलिंदचे बाबा सेवानिवृत्त होते. ते आज घरी नव्हते. मिलिंदच्या बहिणीकडे नाशिकला ते हवाबदलासाठी गेले होते. ते घरी असले कि त्यांची सकाळी छान करमणूक होत असे. मिलिंद आणि मानसीची धावपळ आणि त्यातूनही त्यांची शाब्दिक झोम्बाझोम्बी बाबांना दिवसभर फ्रेश ठेवायची. मानसीला ते शक्य तेवढी मदत करत. पण त्यांच्या तब्येतीला जपण्यासाठी मानसी त्यांना काही करून देत नसे. मिलिंदची आई त्याच्या लहानपणीच म्हणजे तो आठवीत असतानाच देवाघरी गेली. मोठ्या बहिणीने आणि बाबांनीच त्याचा सांभाळ केला होता.
मिलिंद-मानसीचं घर एका जुन्या वाड्यात होता. ते वाड्याच्या मालकाचे भाडेकरू होते. कधीतरी वाड्याचं बांधकाम होऊन स्वत:ची हक्काची जागा होईल अश्या अपेक्षेनी मिलिंदच्या बाबांनी दुसरं घर घेतलं नव्हतं. मिलिंदला ते नवा flat घे म्हणून मागे लागले होते. तसा त्याने घेतला ही असता पण बाबांच्या बायपासमध्ये झालेल्या खर्चामुळे flat चं त्याने लांबणीवर टाकलं होतं. परत आयत्या वेळेस वाड्याच्या मालकाने बांधकाम काढलं तर पैसे तयार हवे म्हणून तो इतरत्र पैसे गुंतवण्यास तयार नव्हता. मानसीनेही समजूतदारपणे सगळं कलाकलानं घेतलं.
“चांगले आहेत… बोलायला, वागायला”, डोळे न उघडता मिलिंद म्हणाला.
“सॅंडी माझी खूप जुनी फ्रेंड आहे” मिलिंदच्या केसात हात फिरवत मानसी म्हणाली. तिच्या हात फिरवण्याने मिलिंदला अजूनच झोप यायला लागली.
“काय रे ऐकतोयेस ना?”, त्याला मधेच हलवून उठवत मानसी म्हणाली, “त्यांची गाडी पण छान आहे नाही”
“हं”- मिलिंद. डोळे मिटलेलेच.
“ए आपण पण घ्यायची गाडी?” -मानसी.
“हं”-मिलिंद.
“हं नाही. ए खरं सांग ना. कधी घेऊयात आपण गाडी? घर नाहीतर गाडी तरी”-मानसी.
“उद्या”, असं म्हणत मिलिंदने मानसीला डोळा मारला. हाताने तिला स्वत:कडे खेचलं.
“उं शहाणा आहेस मला माहितेय उद्या कधी येत नाही…” -मानसी. पुढचं तिला काही बोलताच आलं नाही. कारण तिचे ओठ…
“ऐकतोयेस ना रे!” -मानसीने खात्री केली.
“हो बोल.”, बँकेची स्टेटमेंटस चेक करण्याचं महत्वाचं काम करत मिलिंद टेबलापाशी बसला होता.
“अरे त्यांच्या गाडीला मूनरूफ आहे” -मानसी.
“ओह बर” -मिलिंद.
“काय मस्त वाटतं मूनरूफ!” -मानसी.
“ए आपणही गाडी घेतली की मूनरूफ सांगू हं! पैसे जास्त पडतात पण I think we can afford that much!”, जीभ चावून हसत मानसी म्हणाली.
“बर” -मिलिंद.
“कधी घेऊयात गाडी?”, मानसी परत मुळपदावर.
“घेऊयात” -मिलिंद. गाडी घेणं अशक्य नव्हतं पण ती घेतली आणि घराचं निघालं तर पैसा कुठून उभा करायचा? हा त्याचा प्रश्न होता.
“घेऊयात पण कधी?” -मानसी टेबलापाशी येऊन उभी राहिली. बोलताना थोडी अधीर वाटली, म्हणून मिलिंदने वर पाहिलं. आत्तापर्यंत RAM मध्ये स्टोअर केलेलं सगळा कॅशेत आणलं.
“घेऊयात ना घाई काय आहे?”, तिला शांत करण्याच्या उद्देशाने मिलिंद म्हणाला.
“घर नाहीतर गाडी तरी घे मला”, मानसी नाराजीच्या स्वरात म्हाणाली. ज्या घरात मिलिंदचं बालपण गेलं, त्याच्या आईच्या आठवणी आहेत ती जागा त्याला सोडून द्यायला सांगणं तिच्या मनाला पटणार नव्हतं म्हणून घराच्या बाबतीत तिनं स्वतःला समजावला होतं. त्याची जाणीव मिलिंदलाही होती.
“हे बघ मानसी, तुला माहितेय बाबांच्या बायपासचा मोठा खर्च आत्ताच झालाय. माझ्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते पण चालू आहेत. आपल्या लग्नाच्या वेळी झालेला खर्च वेगळाच.” -मिलिंद. मानसी तोंड फुगवून ऐकत होती. “आपण घेऊयात न गाडी. पण गाडी घेतली आणि वाड्याचं काम निघालं तर मग त्याचे पैसे कुठून आणायचे? मग अजून एक हप्ता मागे लावून घ्यायचा का? तुला माहितेय घराच्या पैशासाठी आपल्याला तयार असायला हवं. मालक कधीही काम सुरु करेल. “, मिलिंद पोटतिडकीने बोलत होता.
“माझ्या बँक अकौंटमध्ये आहेत ना ते वापर.” -मानसी.
“पण मी सांगतेय ना तुला ते पैसे वापरायला मग तुला काय प्रोब्लेम आहे?” -मानसी आततायीपणे म्हणाली.
“मानसी तुला कळत नाहीये.” -मिलिंद.
“मग सांग ना मला.” -मानसी.
“आत्ता नको. तुझं डोकं शांत झाल्यावर.” -मिलिंद. मानसी धुसफुसत स्वयंपाकघरात गेली. दोन-तीन भांडी आपटल्याचा आवाज आला. मिलिंद परत क्रेडीटकार्ड्सचे चार्जेस पाहण्यात गुंग झाला.
“१०-१५ दिवसात बाबा परत येतील. एवढा रुसवा पुरे झाला का? का continue करावा? बाबांसमोर नको राग वगैरे…” अशी मानसीचीही मनात तारेवरची कसरत चालू होती.
“आईचा फोन आला होता. चंद्राला औक्षण कर म्हणून. आज कोजागिरी आहे वाटतं. मी कॅलेंडर पाहिलंच नाही रे! मसाल्याचं दुध पण केलं नाही!”
“हो का कोजागिरी? ओह बर”-मिलिंद.
हातपाय धुवून मानसी स्वयंपाकघरात गेली. gas वर पातेल्यात मसाला दुध ठेवलं होतं.
“हे कोणी केलं? तू केलंस?” -मानसी.
“तुला माहित होतं आज कोजागिरी आहे ते?” -मानसी.
“हो मी मघाशी कॅलेंडर पाहिलं.” -मिलिंद- “आता ते शेजारी झाकलेलं पातेलं बघ”
तिने पाहिलं तर त्यात सुकी भेळ होती आणि शेजारी ओल्या भेळेची तयारी पण. तिला एकदम मस्त वाटलं. एकदम सही!
“तू हे सगळं केलंस? सॉलिड आहेस.” -मानसी.
“गच्चीत कशाला? चंद्र इथे खिडकीतून पण दिसतोय की!” -मानसी.
“अग कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र एका कवडातून पाहणार तू? त्याची बेज्जती आहे ही.”, मिलिंद डोळा मारत म्हणाला “ये मी भेळ आणि दुध घेऊन पुढे जातोय” -मिलिंद.
मानसी ऑफिसचा पश्चिमी पेहराव बदलून, छान पंजाबी ड्रेस घालून, औक्षणाचं ताट घेऊन गच्चीत आली. मिलिंदने गच्चीचा चेहराच बदलला होता. त्याने स्वत: झाडून, पाणी टाकून गच्ची साफ केलेली होती. मधोमध सतरंजी टाकली होती. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या.
“हे पण तू?” -मानसी.
“मग आमचा चंद्र दमून भागून यायचा होता ना?” मिलिंदच्या ह्या बोलण्याने, अंगावरून मोरपीस फिरावं तसं वाटलं मानसीला. किंचित लाजलीही ती.
“मानसी तुला मूनरूफ हवं होतं ना? हे बघ मूनरूफच आहे. आवडलं?”
“ग्रेट वगैरे काही नाही ग! कालान्वये गाडी घेऊच आपण, तुला हवी तशी, मूनरूफवाली, पण तोपर्यंत मून पाहायचा नाही का?” -मिलिंद.
“हं” -मानसी.
“आणि मानसी आपली तर हनिमून फेज चालू आहे. आता मी तुला मून दिला तू मला हनी नको द्यायला?” – असं लाडाने म्हणत मिलिंद मानसीकडे झुकला.
त्याला दूर ढकलून, मानसी उठून, धावत गच्चीचा जिना उतरू लागली. जाताना हसत मागे वळून म्हणाली, “देईन ना ढगांच्या दुलईआड!”


मस्त. मुनरुफ कसा अगदी डोळ्यासमोर उभा राहिला.
अभिप्रायासाठी धन्यवाद सचिन!
एकदम सुंदर ! छान पकड घेते व शेवट सुध्दा मस्त झाला आहे.
अभिप्रायासाठी धन्यवाद काका!
sunder …romantic ..keep up the good work
अभिप्रायासाठी धन्यवाद!
व्वा!
मस्त.
आवडली इष्टोरी!
अभिप्रायासाठी धन्यवाद आल्हाद!
mast. surekh!
धन्यवाद अमोल!
सुरुवातीला मूनरूफ काही डोळ्यासमोर नाही आलं. वाचायला सुरुवात केली तर पहिल्याच वाक्यात ’उष्टी हळद” भेटली.परत विचारात पडलो.”ओल्या हळदी” चा शब्द्प्रयोग माझ्या परिचयाचा .पुढे वाचूलागलो—वाचतच गेलो.आवडलं!फारच छान! असं खरंच घडलं का हॊ? पण हे ललित फारच छान! हं ! पण “उष्टी हळद”
यातून काय बोध घ्यायचा ? जरा स्पष्ट कराल का हो?
ओल्या हळदीचा दाखला सगळीकडे मिळतो. पण कोणी उष्ट्या हळदीविषयी बोलत नाही. मराठी लग्नांमध्ये लग्नाविधीच्या आधी नवऱ्या मुला मुलीला हळद लावतात. पण त्यातही क्रम असतो. मुलाकडची मंडळी मुलाला हळद लावली कि त्यातली उरलेली हळद मुलीला नेऊन देतात. म्हणूनच त्याला उष्टी हळद म्हणतात. मुलाची उष्टी हळद मुलीला लागते.
मला हे काही माहित नव्हतं.मग मी माझ्या पत्नीला विचारलं. तिनं हेच सांगितलं.मग म्हंटलं मला का माहित नाही. तर माझ्या विवाहाच्यावेळी म्हणजे ३४-३५ वर्षापुर्वी मी त्यादिवशी पहाटे ऊठून नेहमी प्रमाणे अंघोळ उरकून घेतली होती म्हणे.खरं म्हणजे मला हे असे कुठलेच विधी करणं पसंत नव्हतं, नोंदणी पद्धतीने करावा असं वाटत होतं. पण त्याला सगळ्यांनी मोडता घातल्यावर माझ्यापुरतं मी हा मार्ग चोखळला ! त्यामुळे मला हा विधी माहीत्च झाला नाही.माहितीबद्दल धन्यवाद!
PDK62+
थोडक्यात चालींविरुद्ध बंडखोरी! मग हळद अजिबात लावून घेतली नाही का?
तशी माझ्या नवर्यानेही केली अहो! सीमांतपूजनाला पाय धुवू देणार नाही म्हणाला. गुरुजी म्हणाले जरुरी आहे तर स्टेजवर उभा राहिला आणि खाली उतरीन म्हणाला.
मी कथा वगैरे फारसं वाचत नाही- ,मला ललित जास्त आवडतं वचायला.. पण ही कथा वाचली आणि आवडली. खुप छान जमली आहे.
धन्यवाद महेंद्र!
chhan lihita..pustak alay ka tumacha? worth releasing a story book..
नाही हो नचिकेत, अजून पुस्तक नाही आलंय. एवढा विचार केला नाहीये. अजून शिकाऊ आहे. अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
शिकाउ का म्हणताय ? फारच छान लिहिताय तुम्ही.
माझे लेख तुम्ही वाचताय ना?
काका तुमच्या सार्थ-मनाचे श्लोक च्या पोस्टस जरा वेळ काढून वाचेन म्हणते. मला आणि माझ्या नवऱ्याला त्यात फार रस आहे.
अंत: प्रज्ञेची पोस्टही खूप आवडली.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
सार्थ निवडक मनाचे श्लोक लिहिण्यामागे एक कारण आहे. आम्ही एक मोफत सर्वांगिण शिक्षण प्रतिष्ठान चालवतो. ५-१० वी पर्यंतच्या मुलांना सूर्यनमस्कार, संस्कारासाठी म्हणुन मनाचे श्लोक ,इतर तांत्रिक विषय इ. मोफत शिकवणे असा उपक्रम करतो.आता विद्यार्थ्याच्या आत्मह्त्या गाजताहेत. मग आमच्यातील एका ज्येष्टाने निवडक मनाचे श्लोकावर लिहिण्याचा आग्रह धरला.६० श्लोक निवडून त्याची पुस्तिका छापून घेत आहोत.त्याचा खर्च जे इच्छुक यात भाग घेउ इच्छित असतील ते करतील.आणि ह्या पुस्तिका या मुलांना हे श्लोक पाठांतर करण्याच्या नि रोज सुर्यनमस्कार घालण्याच्या अटिवर मोफत वाटण्यात येतील. .याविषयावर एक लेख येथे दिला आहे तो वाचावा. धन्यवाद !
जरूर वाचीन, अभिप्राय पण देईन!
संपदा
लिहित रहा..
अभिनंदन.. चक्का भाषांतर होतंय की !! मनःपुर्वक अभिनंदन..
धन्यवाद महेंद्र! अनुवाद वगैरे मलाही अनपेक्षित होतं एकदम!
सुरुवातीपासुन शेवटपर्यंत एकदम बेस्ट झाला आहे लेख…
अभिप्रायाबद्दल धन्यवाद देवेंद्र!
एकदम मस्त.
मून रुफ …..लायी भारी…
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
चालीविरुद्ध बंडखोरी तर होतीच. पण या सगळ्या कर्मकांडाबाबत अतिषय चिड होती मला. पण आताच्या पिढी एवढी घरातील ज्येष्ठांच्या विरोधात जाऊन त्यांचं मन दुखवण्याची इच्छा पण नव्हती. भटजी नावाच्या निर्बुद्ध माणसाचा मला फार तिटकारा यायचा ! ज्या गोष्टी तर्काला पटत नव्हत्या त्या मानायच्या नाहीत. हीच ती तर्कप्रज्ञा !
एकदा भटजी विचारले-गोत्र काय,मी सांगितले अन त्याने लिहून घेतले -”शवनक”. झाले माझे माथेच भडकले. त्याने शौनक चे शवनक केले म्हणून. त्याला विचारले कुठल्या शहाण्याने तुला भटजी केले सांग? त्याला वेद म्हणजे काय? कुठले कुठल्या वेदाचा, उपनिषदांचा,अभ्यास केलाय सांग. माझ्या प्रश्नांच्या भडीमाराने तो घाबरून गेला. मीच संयम ठेऊन नंतर शांत झालो. जाउदे म्हणून !
very nice story. I was wondering if I can translate it into English and publish on my blog. You will still have all copyrights and I will mention your name and provide a link to original post here. Pls let me know on vegapoint@gmail.com Thanks
My blog: http://www.vegapoint.blogspot.com
I liked this story so much that I couldn’t wait. I have published the translated version of this story on my blog. I have mentioned your name and a link to here. Please let me know if your consent is otherwise, I will remove the story from my blog. Forgive me for a) not waiting for your consent and b) writing this comment in English on your Marathi blog.
I don’t know how to write Devanagari on net and I don’t like typing Marathi in ‘English script’.
This story is really very good. I would appreciate your comments on translated version if you happen to read it.
http://vegapoint.blogspot.com/2010/03/moonroof.html
Dear Vega,
I see your effort in translating this whole long story. I will definately read thoroughly and will let you know my opinion. In my story I have mentioned you and your link at the top. I would prefer you do the same.
I am flattered that you liked my story and you were kind enough to ask before translating. I hope your translated version of my story would receive the same response as I received for original.
I appreciate your effort. All the best for future writing.
-Sampada
S.N:- इंग्रजी मधून विचारल्यामुळे इंग्रजीतून प्रतिसाद देत आहे.
फारच छान जमलीये गोष्ट ,सगळ कस डोळ्यासमोर उभ राहत.
Keep up writing,you have that in u.