अमेरिकेत आल्यानंतर, माझा सुडोकू ह्या खेळाशी परिचय झाला. तसा टाइमपाससाठी शब्दकोडे किंवा इतर कोडी सोडवायला मला खूप आवडतं. सुडोकूने मला आणि माझ्या नवऱ्याला चांगलं झपाटलं आहे.
सुडोकू हा जपानी अंकखेळ आहे. सुडोकूमध्ये साधारणत: ८१ छोट्या चौरसांनी बनलेला, ९*९ चा एक मोठा चौरस असतो. ८१ पैकी, बहुतांश चौरस मोकळे असतात. सुडोकू तयार करणाऱ्याने, १ ते ९ पैकी काही आकडे ह्या ८१ पैकी. काही चौरसांमध्ये विखरून ठेवलेले असतात. विखरून ठेवलेल्या आकड्यांची मांडणी अशी काही केलेली असते की
१. मोठ्या चौरसाच्या एका ओळीत आणि एका खांबात १ ते ९ पैकी सारे आकडे यायला हवेत आणि कोणत्याही आकड्याची पुनरावृत्ती नको.
२. मोठ्या चौरसाच्या आत असलेल्या ३*३ च्या ९ चौरसांमध्येही १ ते ९ पैकी सारे आकडे यायला हवेत आणि कोणत्याही आकड्याची पुनरावृत्ती नको.
गाळलेल्या चौरासातले आकडे अचूक भरणं म्हणजेच हे अंककोडं सोडवणं. एका सुडोकूला बहुतांशी एकच उत्तर असते. पण एकापेक्षा जास्त उत्तरे असेली सुडोकू कोडीही असतात.
हा खेळ खूप addictive आहे. तो खेळताना डोक्यालाही चांगली चालना मिळते. वारंवार खेळल्याने त्याचा चांगला सराव होतो आणि खेळण्याची तंत्रे साहजिकच अंगी बाणली जातात. कोणाची इच्छा असल्यास, सुडोकू कोडे सोडवायची काही तंत्रे अथवा उदाहरणे मी उपलब्ध करून देईन.
सुडोकू हा खेळ पुस्तक, हस्तखेळ रुपात, वर्तमानपत्रात, इंटरनेटवर तसेच फोनवरही उपलब्ध आहे. सुडोकुची असंख्य पुस्तके बाजारात विकत मिळतात. एकटे असताना खेळण्यासाठी मेंदूला चांगले खाद्य आहे.


6 responses to “सुडोकू”
savadhan
फेब्रुवारी 4th, 2010 at 18:22
सुडोकू सोडवताना वेळ कसा जातो तेच कळत नाही.मी सुरुवातीला जेव्हा हे सुडोकू सोडवू लागलो ,तेव्हा झपाट्ल्यागत तासनतास सोडवत बसे.कधीकधी दिवसच्या दिवस त्यात निघून जाई.मग हा खेळ मी माझ्या पत्नीस शिकवला.आता “सकाळ” आला की ती सुडोकू सोडवत बसते,मी सोडवले तर तीला ते चालत नाही.एकाच सुडोकूचे हजारो सूडोकू तयार करता येतात.त्यामुले सुडोकू तयार करून ते एका कागदवर उतरवून घेउन सोडव्ण्यचा उद्योग मी बरेच दिवस करत होतो.आत्ता त्यात मला फारसा रस वाटत नाही.
शब्दांकित
फेब्रुवारी 4th, 2010 at 18:43
माझा ही काहीसं असंच झालं होतं. पण काही दिवसाचा ब्रेक घेतल्यावर परत रस वाटतो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
sureshpethe
फेब्रुवारी 4th, 2010 at 19:46
माझ्या मुलीने मला हा कसा खेळायचा हे शिकवले. हा खेळ एकट्यासाठी अतिउत्तम आहे व ह्यात वेळ पण छान जातो. पण अलिकडे माझ्यात एव्ह्ढा ’पेशन’ रहात नाही त्यामुळे आता सोडवत बसत नाही इतकेच !
शब्दांकित
फेब्रुवारी 4th, 2010 at 19:58
खूप दिवस सोडवलं कि काही दिवसांनी बोअर होऊ शकतं पण काही दिवसांच्या ब्रेक नंतर छान वाटतं. सुडोकू खूप कठीण असेल तर सोडवता आलं नाहीतर frustrating पण होतं.
mipunekar
फेब्रुवारी 22nd, 2010 at 10:32
अजूनपर्यंत सुडोकू खेळलो नाहीये…
थोडी पूर्वकल्पना आली आहे म्हणून खेळावेसे वाटत आहे…
शब्दांकित
फेब्रुवारी 22nd, 2010 at 11:15
आपल्या सुडोकू प्रयोगास माझ्या शुभेच्छा!