सुडोकू  -संपदा म्हाळगी-आडकर   अमेरिकेत आल्यानंतर, माझा सुडोकू ह्या खेळाशी परिचय झाला. तसा टाइमपाससाठी शब्दकोडे किंवा इतर कोडी सोडवायला मला खूप आवडतं. सुडोकूने मला आणि माझ्या नवऱ्याला चांगलं झपाटलं आहे. सुडोकू हा जपानी अंकखेळ आहे. सुडोकूमध्ये साधारणत: ८१ छोट्या चौरसांनी बनलेला, ९*९ चा एक मोठा चौरस असतो.  ८१ पैकी, बहुतांश चौरस मोकळे असतात. सुडोकू तयार [...]