Archive for फेब्रुवारी, 2010

तळव्यावर मेंदीचा (भाग १)

तळव्यावर मेंदीचा -संपदा म्हाळगी-आडकर २/२७/१०   रात्रीचे २ वाजलेत. इंटरनेटवर तो इमेल चेक करतोय. डोळे फक्त एका इमेलच्या प्रतीक्षेत. “ती रोज न चुकता येते खेळायला. आज कशी नाही आली?”, “एक इमेल तरी करायची ना?”, “मला का करेल ती इमेल? मी कोण तिचा? ती तरी कोण माझी?” असे अनेक विचार त्याच्या मनात चाललेत. तेवढ्यात स्वयंपाकघरात काहीतरी वाजलं [...]

गुप्तधन

गुप्तधन -संपदा म्हाळगी-आडकर   झुंजारवाडीच्या सरपंचपदी धुरंदर पाटीलाची निवड झाल्यापासून तो चांगलाच हवेत होता. तसं धुरंदर म्हणण्यासारखा त्याने अजून काहीही केलं नव्हतं. आपल्या वडिलांना, झुंजारराव पाटीलांना, अभिमान वाटावा असं एकच काम त्याने केलं होतं. वडिलांसाठी गावाचं नाव हुन्नरवाडीचं झुंजारवाडी केलं होतं. ठाकरेंकडून त्याने प्रेरणा घेतली असावी कदाचित.   धुरंदरला वाड-वडिलार्जित बराच पैसा-अडका आणि जमीन-जुमला मिळाला पण [...]

कहाणी

कहाणी -संपदा म्हाळगी-आडकर २/२४/१०   काळामागे धावत जाते पुलाखालाचे पाणी भविष्याचे वर्तमान अन वर्तमानाची कहाणी   प्रारंभाला होती भरली, घटिका पाणीग्रहणी नायक राजा आणि नायिका एक दिसाची राणी   घरट्यासाठी झटतो राजा, शोधी दाणा-पाणी राणीसुद्धा पावकी निमकी, हिशोबाची दिवाणी   कहाणीतला हरेक पन्ना, ना नुसती देणी-घेणी रुसवे-फुगवे, प्रेम जिव्हाळा, कधी रक्ताचे पाणी   रक्तातून मग कळी [...]

देवकीनंदन

देवकीनंदन -संपदा म्हाळगी-आडकर २/२०/१०   थोडक्यात पार्श्वभूमी: कृष्णजन्मानंतर येऊ घातलेल्या पुत्रविरहाचा शोक देवकी करत आहे. तेंव्हा बाळकृष्णाने तिला कसे समजावले. काहीशी काल्पनिक अशी ही कविता!   मम सजल नेत्रांत तुझे रूप साठवून पळभर ना सरला, कसे करू रे त्यजन?   मामा असे लडिवाळ हीच जगताची खूण कंस ठरला अपवाद, तुझे माझे हे प्राक्तन   तव अग्रज दुर्दैवी [...]

माय नेम इज अर्ल

माय नेम इज अर्ल -संपदा म्हाळगी-आडकर २/१८/१०   अमेरिकेत फक्त विनोदी मालिका, चित्रपट आणि जाहिराती येणारी एक स्वतंत्र वाहिनी आहे. तिचं नाव TBS. ह्या वाहिनीवर काही अप्रतिम मालिका आणि चित्रपट पाहायला मिळतात. त्यातली एक मालिका म्हणजे “माय नेम इज अर्ल”. भरत जाधव किंवा मकरंद अनासपुरे ह्यांच्या चित्रपटांइतके, डोके बाजूला ठेऊन पहायची ही मालिका नव्हे. मालिकेचा मूळ [...]

मूनरूफ

मूनरूफ -संपदा म्हाळगी-आडकर २/१६/१०   माझ्या गोष्टीचा इंग्रजी अनुवाद: अनुवाद सौजन्य: वेगा अनुवाद येथे वाचता येईल: http://vegapoint.blogspot.com/2010/03/moonroof.html   “मानसी अग झालं कि नाही तुझं? किती वेळ?” मिलिंद ची रोज सकाळ सारखी आजही अखंड बडबड चालू होती. “आले आले.. डबे भरतेय.” मानसी ही ठरलेली उत्तर देत होती. लग्नाला दोनच महिने झाले होते. अजूनही उष्ट्या हळदीचा वास तसाच [...]

मोगरा

मोगरा -संपदा म्हाळगी-आडकर २/८/१०   माझ्या मनातला हा मोगरा फुलावा वाऱ्यासवे विमुक्त तो दूर दरवळावा   पाहील शोधू कोणी जर स्त्रोत सुगंधाचा दिसेल ना कुणाही हा मोगरा मनीचा   मम साजणास सुद्धा, हा कूटप्रश्न पडावा मग रात्रभर तोही विचारात तळमळावा   तो विचारेल मजला, येई गंध मोगऱ्याचा वास हा तुझा का, का नव्या अत्तराचा?   [...]

बाटलीतली श्रीमंती (भाग ४)

एअरपोर्टवर वेळेत पोहोचायचं होतं. वाटेत १ काम करून जायचं होतं. रॉबिनला सुझीचा राग आला. “तुला आयत्या वेळेस कसं सुचतं ग सगळं? आधी का प्लान केलं नाहीस?” त्याचे प्रश्न सुरु झाले. “थांब रे २ मिनिटांचं काम आहे.”. Mall मध्ये जाऊन आपलं २ मिनिटांचं काम १० मिनिटांत पूर्ण करून सुझी परत आली. ती आज खूपच उत्साहात होती. [...]

बाटलीतली श्रीमंती (भाग ३)

कागद वाचताना अश्रू कधी झरू लागले, सुझीला कळलंच नाही. पत्र संपल्यावर इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. ती ढसाढसा रडू लागली. रॉबिनचे डोळेही पाणावले होते. त्याने हळूच सुझीला कुशीत घेतलं.   ****    बाटलीचं काय करावं ह्या विचारात रॉबिन कित्येक दिवस गढलेला होता. हा विषय सुझीपाशी काढला की तिला रडू यायचं आणि दिवसाचं खोबरं [...]

बाटलीतली श्रीमंती (भाग २)

सुझी कॉलेजच्या शिक्षणानिमित्त युरोपात राहिली होती. भाषांची आवड असल्याने तिने Spanish आणि जर्मन शिकून घेतली. तिने वाचायला सुरुवात केली.   तारीख- ४ ऑगस्ट १९३८   ठिकाण- प्राग प्रिय स्टीव्ही, तू कसा आहेस? तुला भेटून खूप दिवस झाले. तुला झेक समजत नाही म्हणून मी जर्मन मध्ये लिहायचा प्रयत्न करत आहे. ३ महिन्यापूर्वी भेटलास तेंव्हा तू हे गुलाबी [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.